Skip to content
व्यसनांबद्दल सर्रास आढळणारे गैरसमज
- व्यसनी व्यक्ती सामाजिकदृष्ट्या गैरवर्तन करत असतील, हिंसक बनत असतील, बेहोश होत असतील तरच त्यांना उपचार द्यावेत.
- सातत्याने मद्यपान करुनही तोल जात नसल्यास व्यक्तीला उपचारांची गरज नाही.
- अंमली पदार्थांचे सेवन करणारी व्यक्ती कार्यरत असेल आणि बर्यापैकी पैसे मिळवत असेल तर तिच्या प्रश्नात हस्तक्षेपाची गरज नाही. तिला उपचारांची गरज नाही.
- होळी आणि रंगपंचमीसारख्या सणांच्या निमित्ताने दारु, भांग इ. चा वापर होत असतो. त्यामुळे अशा वेळी या पदार्थांचे सेवन करण्यात काहीच वावगे नाही.
- मद्यसेवनामुळे भूक आणि लैंगिक क्षमता यात वाढ होते. सिगारेट, दारु यांच्या वापराची सध्या फॅशन आहे. त्यांच्या वापराने कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. किंबहुना त्यांचा वापर म्हणजे व्यावसायिक / सामाजिक संकेतांचा एक भागच होय.