व्यसनमुक्त जीवनाकडे…
व्यसनमुक्त समाज निर्मिती हे आमचे स्वप्न आहे!
- जाणीव-जागृती, उपचार व पुनर्वसन या माध्यमातून हे ध्येय प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू.
- मानवी मूल्यांना जपणारी, संस्कृतीशी सुसंगत तसेच अनुभवाशी प्रामाणिक अशी उत्स्फुर्त उपचार पद्धती विकसित करणे व जीवनशैली म्हणून तिचा स्वीकार करणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
- माणसातील माणूसपण आणि आशावाद जागविण्याचा हा शास्त्रीय व सांघिक प्रयोग, सहभागी होणार्या प्रत्येकाला समृद्ध करेल असा आमचा विश्वास आहे.
- हाती घेतलेल्या कार्यातील प्रत्येक क्षणाला निष्ठापूर्वक सामोरे जाऊन स्वत:ला चतुरस्त्र बनविण्याचा आमचा प्रयत्न असेल. स्वावलंबन, स्वयंशिस्त, कल्पकता व परस्पर आदर ही आमची मार्गदर्शक सूत्रे असतील.
- व्यसनमुक्तीच्या वाटेवरच्या प्रत्येक व्यक्तीला व कुटुंबाला आम्ही सदैव आधार देण्याचा प्रयत्न करु आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला हातभार लावू.
- ‘व्यावसायिक निष्ठा जपत, उत्कृष्ट दर्जाचे सहाय्य देत राहणे’ हाच आमचा संकल्प, हाच आमचा ध्यास!