Effect on family..
व्यसनी व्यक्तीच्या कुटुंबाचे पाच प्रकार तयार होतात
१. अप्रत्यक्ष सहकार्य करणारे | २. आंधळेपणाने मदत करणारे | ३. हताश नातेवाईक | ४. भांडण करणारे कुटुंबीय | ५. कोरडे नातेवाईक |
व्यसनी व्यक्तीच्या कुटुंबात निर्माण होणारे दोष..
- प्रत्येकाची दैनंदिनी बिघडते
- बायकोच्या जेवण बनवण्यात चुका
- मुलांच्या अभ्यासात चुका
- आई-वडीलांचे उतार वयात आरोग्याकडे दुर्लक्ष
- कुटुंब दिशाहीन होते
- कुटुंबाची निर्णय क्षमता खालावते
- कुटुंबातील आपापसातील संवाद त्रोटक होतात
- प्रत्येकजण दुसर्याची चूक शोधतो
- प्रत्येकाला आपापल्या मर्यादांची जाणीव राहत नाही
व्यसनी व्यक्तीच्या कुटुंबाला काय माहिती हवे..
- दारु हा व्यसनाचा घातक आजार आहे. ज्यास वैद्यकीय मदतीची गरज आहे.
- शांतपणे बसून व चर्चेने या आजाराच्या मूळापर्यंत पोहचता येऊ शकते.
- व्यसनाधीन माणसाच्या प्रत्येक चुकांवर पांघरुण घालू नका.
- व्यसनाधीन व्यक्ती दारु न पिऊन कुटुंबीयांवर उपकार करत नसते.
- इतर व्यसनाधीन व्यक्तींच्या कुटुंबीयांशी संवाद साधा.
- प्रत्येकाने आपल्या वैयक्तिक गरजा व कौटुंबिक गरजा ओळखण्यास शिकले पाहिजे.
- जगात फक्त त्यांच्याच कुटुंबीयांवर अशी परिस्थिती ओढवलेली नसून इतरही अनेक कुटुंबीयांवर अशी परिस्थिती आलेली असते.
व्यसनी व्यक्तीच्या कुटुंबाने काय टाळायला हवे..
- आणलेल्या दारुच्या बाटल्या लपवून ठेवणे किंवा फेकून देणे.
- व्यसनाधीन व्यक्ती व्यसनाच्या अंमलाखाली असताना त्याच्याशी वाद-विवाद करणे.
- सतत त्यांच्याशी व्यसनाबद्दल बोलणे.
- रुग्णांना अवाजवी भीती दाखविणे किंवा शिक्षा करणे.
- सतत उपदेश देणे.
- लाच देणे.
- भावनिक आव्हान देणे.
- भावनात्मक यातना देणे.