प्रिय मित्रा, कसा आहेस? A letter to an alcoholic
प्रिय मित्रा,
कसा आहेस? सध्या पूर्वीसारखाच आहेस. सॉरी झालास ना? हे सगळं असं का झालं? कशामुळे झालं? कसा चुकलास तू? आम्हाला हे प्रश्न तुला आत्ता विचारायचे नाहीत. या प्रश्नांची उत्तरं तू आम्हाला देण्याऐवजी स्वत:च स्वत:शी प्रामाणिक राहून द्यावीस अशी अपेक्षा आहे.असं म्हणतात की, दुसर्याने आपली चूक दाखवली की ते आपल्या मनाला खूप लागतं. पण आपण स्वत:च स्वत:च्या चुका पडताळून पाहिल्या तर ते निदान मनाला तरी लागत नाही. या चुका नुसत्या पडताळून पहायच्या नाहीत, तर त्या चुकांमधून बोध घ्यायचाय, त्या पुन्हा होऊ न देण्याची जबाबदारी घ्यायचीए. आमचे सर सांगतात, की मानसिक आजार हे कमकुवत मनाच्या माणसांनाच होतात. व्यसनाधीनता हा देखील मानसिक आजारच आहे ना? आणि तो तुला झालाय म्हणजे तुझं मनदेखील कमकुवतच ठरलंय ना? मित्रा, सांग बरं तुझ्या अशा कमकुवत मनानं पुढे येणार्या किती प्रसगांना तू सामोरं जाऊ शकणार आहेस? कोलमडणार आहेस मित्रा. अजूनही वेळ गेलेली नाही. तू निश्चितपणे चांगला होऊ शकतोस. फक्त थोडीशी तुझी मानसिक ताकदच कमी पडतेय. पण ही ताकद वाढवणं नक्कीच अशक्यप्राय नाही. होय ना?मित्रा, आपल्याबद्दल लोकांनी चांगलं म्हटलं पाहिजे, आपण जिथे जाऊ तिथं आपली विचारपूस करुन आपुलकीनं बोललं पाहिजे. आपल्या आनंदात-दु:खात सर्वांनी सामील झालं पाहिजे, आपलं अस्तित्व स्वीकारलं पाहिजे अशी प्रत्येकाची, अगदी प्रत्येकाची सुप्त इच्छा असते. आणि या इच्छेविरुद्ध घडलं तर? आपल्या समोर नसेल पण कोणी आपल्या मागून आपल्याबद्दल वाईट बोलत असेल तर? आपल्या सुख-दु:खाशी कुणालाही काहीही देणं-घेणं नसेल तर? किती वाईट वाटेल आपल्याला! आपल्याला दुसर्याच्या मनात काहीच किंमत नाही हा विचार खूप भयंकर आहे. होय ना? पण असं कधी होऊ शकतं? जेव्हा आपल्याचकडून काही चुका होतात. आणि त्यादेखील अशा की ज्यांना ‘माफ करणं’ देखील कठीण होतं.मित्रा, तुझ्या हातून चूक झाली आणि हे तू मान्य देखील केलंस. मग ही चूक सुधारणं, ती पुन्हा होऊ न देणं आता तुझी जबाबदारी आहे. तुझा मानसिक कमकुवतपणा, अविवेकी दृष्टिकोन, समस्येची हाताळणी योग्य प्रकारे करता न येणं हे काही दोष तुझ्या चुकीला कारणीभूत ठरलेत. मित्रा, नकारात्मकतेतून बाहेर पड, चुका सुधार. सगळ्या प्रसंगांना आत्मविश्वासाने सामोरं जा. यशाची दार तुझ्यासाठी उघडी आहेत.

मित्रा, दु:ख कोणाला नाहीत? फक्त प्रत्येकाची ते दु:ख सहन करण्याची ताकद आणि त्या दु:खाला सामोरं जाण्याची तयारी वेगवेगळी असते. आणि तुझ्यात ही ताकद निश्चितच कमी नाही. बरोबर ना? फक्त या ताकदीचा तुला थोडा विसर पडला आहे.
मित्रा, खूप चांगले बदल तू करु शकतोस आणि ते तूच करु शकतोस हे लक्षात ठेव!
काही विधानं चांगली व महत्त्वाची वाटली म्हणून ती पुढे देत आहोत-
- आयुष्यात ९० टक्के गोष्टी चांगल्या, सुखदायक असतात. १० टक्के गोष्टी वाईट, त्रासदायक असतात. आपलं दुर्दैव एवढंच, की आपण आपले १०० टक्के लक्ष त्या १० टक्के गोष्टींवरच केंद्रित करतो.
- कोणाचं चुकलं हे शोधण्यापेक्षा काय चुकलं हे शोधणं श्रेयस्कर.